पोफळी : देशातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असणारे तसेच युवा, शेतकरी, महिला आणि छोटे व्यावसायिक यांचा आवाज बुलंद करणारे देशाचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज पोफळी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोननलक्ष्मी घाग यांच्या मार्गदर्शनाखाली व चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री. महादेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. देशातील युवा वर्गाला सशक्त बनवायचे असेल, तर त्यांना चांगले शिक्षण मिळणे गरजेचे आहे. आदरणीय राहुलजी गांधी यांनी नेहमीच लहान मुलांना व युवा वर्गाला शिक्षणासाठी प्रेरित केले असून, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच हा कार्यक्रम हाती घेतल्याची भावना महादेव चव्हाण यांनी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित लहान मुला-मुलींनीही राहुलजी गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत काँग्रेस पक्षाचे आभार मानले.