खेड (चंद्रकांत बनकर) :

कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या शिमगोस्तवाची आज पंचमी दिवशी सांगता होते, शिमगा उत्सवाला कोकणात आलेल्या लाखो चाकरमान्यांचा आज पासून परतीचा प्रवास सुरू झाला आहे कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड रेल्वे स्थानकात उभे राहण्यासाठी देखील जागा नाही इतकी तुफान गर्दी सकाळपासून पाहायला मिळत आहे, सकाळी रत्नागिरीहून दिव्याला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमध्ये आत शिरण्यासाठी देखील जागा नव्हती इतकी गर्दी कोकण रेल्वेला पाहायला मिळत आहे आत शिरायला भेटले नाही म्हणून अनेक प्रवासी स्थानकातच रखडून राहिले काही प्रवासी ट्रेनच्या दरवाज्याच्या ठिकाणी उभे राहून अक्षरशः जीव धोक्यात घालून लोंबकळत प्रवास करताना देखील पाहायला मिळाले