चिपळूण : स्मार्ट मीटर बसवण्यास तूर्तास स्थगिती – राष्ट्रवादीची थेट महावितरण कार्यालयात धडक! स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.२४ तासांच्या आत स्मार्ट मीटर बदलावे, असे मेसेज व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री.भांबरे यांची भेट घेऊन नागरिकांच्या भावना व तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यकारी अभियंत्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत चर्चा केली.चर्चेनंतर चिपळूणमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास तूर्तास स्थगिती देण्यात आल्याची माहिती शिष्टमंडळाला देण्यात आली.*या शिष्टमंडळामध्ये प्रांतिक उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम,तालुका अध्यक्ष नितीन उर्फ अबू ठसाले,शहराध्यक्ष मिलिंद कापडी,विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेशजी राणे,माजी सभापती सुरेश खापले,माजी उपसभापती पांडुशेठ माळी,अभिजित खताते,माजी युवक अध्यक्ष सिद्धेश लाड,अजमल दलवाई,राकेश चाळके,रवींद्र इंगावले,कृष्णा आंबेडे,रमेश बंगाल,विलास महाडिक,निलेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
चिपळूणमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास तूर्तास स्थगिती – राष्ट्रवादीची थेट महावितरण कार्यालयात धडक!
