लांजा (गोविंद चव्हाण) लांजा तालुक्यातील वेरवली येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचा२२वा वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक, आध्यात्मिक सांस्कृतिक असे कार्यक्रमा पार पाडण्यात आले.या साठी जगप्रसिद्ध गाजलेले कीर्तन कार सातारकर व हिमालय तपेश्वी कव्हर महाराज यांची कीर्तने ठेवण्यात आली होती.
दि.२६ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत भव्यदिव्य कार्यक्रमा सोहळा पार पडला दि.२६ते२९ पर्यंत ह.भ.प.भगवतीताई सातारकर व ह.भ.प.चिन्मय महाराज सातारकर यांची कीर्तन सेवा झाली.यांनीएका अभंगावरील चार कीर्तन केली तो अभंग संतांच्या संगती मनोमार्गती .अकलावा श्रीपती येणे पंते .व ३०ला ह.भ.प.अशोकानंद कव्हर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. सकाळी काकड आरती , ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन, प्रवचन , माऊली हरीपाठ, कीर्तन,जागर असे कार्यक्रम संपन्न झाले.यामध्ये,वेरवली, लांजा,आगरगाव,व्हेळ, भांबेड, खेरवशे,हरचिरी,वाडगांव, वाकेड,पुणस,आसगे या गावातील वारकरी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख ह.भ.प.सुभास साबाजी राणे यांनी मेहनत करून कार्यक्रम पार पाडले.