पनवेल (वैभव लबडे) : शिवसेना पक्षाची अधिकृत युवा आघाडी असलेल्या युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे खंदे कार्यकर्ते प्रणव लबडे यांची युवासेना क्रीडा कक्ष जिल्हा अध्यक्ष (पनवेल, कर्जत, उरण विधानसभा) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबतचे अधिकृत नियुक्ती पत्र जारी करण्यात आले असून, या निवडीमुळे स्थानिक राजकीय आणि क्रीडा वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. तसेच, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या शिफारसी व विनंतीनुसार या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
