चिपळूण : तेव्हा केलेला विरोध आज योग्य ठरला! चिपळूणमध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्यास शौकत मुकादम यांनी सुरुवातीपासूनच ठाम विरोध केला होता. कोकणातील अतिवृष्टी, पेव्हर ब्लॉकवर शेवाळे धरल्यामुळे होणारे अपघात तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे पेव्हर ब्लॉक हलून बाहेर येण्याचा धोका त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता.
15 एप्रिल 2024 रोजी दोन मोठे ट्रेलर भरून पेव्हर ब्लॉक चिपळूणमध्ये आणण्यात आले होते. त्यावेळी शौकत मुकादम यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे कार्यकारी अभियंता जाधव साहेब,उपकार्यकारी अभियंता कुलकर्णी साहेब आणि पोलीस निरीक्षक शिंदे साहेब यांच्याशी संपर्क साधला.यानंतर कार्यकारी अभियंता जाधव साहेब यांनी यापुढे चिपळूणमध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार नाहीत,असे शौकत मुकादम यांना सांगितले. त्यानंतर पेव्हर ब्लॉक भरलेले दोन्ही ट्रेलर परत पाठवण्यात आले.आज नागोठणे परिसरातील पेव्हर ब्लॉकची झालेली दुर्दशा पाहिल्यानंतर शौकत मुकादम यांनी त्यावेळी केलेला विरोध किती योग्य होता, हे स्पष्ट होते. अवजड वाहनांची वाहतूक झाल्यानंतर पेव्हर ब्लॉक हलून बाहेर येतात, रस्ता धोकादायक बनतो आणि अपघाताचा धोका वाढतो.चिपळूणमध्ये तेव्हा विरोध केला…आज नागोठणेची परिस्थिती त्यामागचे कारण स्पष्ट करते!
आज त्याची सत्यता समोर आली!