चिपळूण : चिमुकल्यांच्या निरागस हालचालींना आणि त्यांच्या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ चिपळूण यांच्या वतीने चिमुकल्यांची दूड-दूड शर्यत’ अर्थात बेबी क्रॉलिंग रेस आयोजित करण्यात आली आहे. ही आगळीवेगळी स्पर्धा रविवार दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत ६ ते १८ महिन्यांपर्यंतच्या बालकांना सहभागी होता येणार आहे. पालकांसाठी आपल्या चिमुकल्यांच्या बालपणीच्या आनंददायी क्षणांना अनुभवण्याची आणि त्यांच्या उत्साहाला दाद देण्याची ही अनोखी संधी ठरणार आहे.
स्पर्धेसाठी प्रति सहभागी २०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले असून, नोंदणीची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२६ आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक बालकाला प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या चिमुकल्यांची नोंदणी करून या अनोख्या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेचे आयोजन लो. टिळक स्मारक वाचन मंदिर, बाळशास्त्री जांभेकर सभागृह, श्री जूना कालभैरव मंदिर, सामोरे, मार्कंडी चिपळूण येथे करण्यात आले आहे.