चिपळूण – येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डॉ.दातार विज्ञान, डॉ. बेहेरे कला आणि श्री पिलुकाका जोशी वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), चिपळूण कृषि   विभाग महाराष्ट्र शासन,तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात रानभाजी पाककला, भित्तिपत्रक व Reel स्पर्धा घेण्यात येणार आहे.यासाठी प्रथम ३ विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे.
रानभाज्यांचे महत्त्व, पोषणमूल्य आणि जैवविविधतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.१३ ऑगस्ट रोजी डीबीजे महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.यामध्ये रानभाज्या प्रदर्शन, विक्री आणि रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आपल्या नैसर्गिक अधिवासा बद्दल तसेच रानभाज्या बद्दल अधिक माहिती मिळवून पर्यावरण संवर्धनाबाबाद जागृती निर्माण करणे.म्हणून या रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी रानभाजी असलेला पदार्थ घरी तयार करून आणावा, पदार्थांसोबत पाककृती व पौष्टिक गुणधर्माची माहिती कागदावर लिहून आणणे आवश्यक आहे.चिपळूण तालुक्यातील सर्व महाविद्यालय ,शाळा तसेच नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.महोत्सवाचे आयोजन डी बी जे कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय एनएसएस विभाग,  महिला विकास कक्ष,  स्वयंसिद्धा समिती आणि एग्रीकल्चर विभाग यांच्यातर्फे करण्यात येत आहे.सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी चेअरमन श्री मंगेश तांबे, प्राचार्य डॉ माधव बापट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.योगेश आगवेकर ,प्रा. सौ.स्वरदा कुलकर्णी, रजिस्ट्रार श्री विजयेंद्र जाधव,शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.