गुहागर : सरकारच्या धोरणनुसार राज्यात महिला शेतकरी प्रमाणपत्र धोरण जारी करण्यात आले आहे ज्या महिलांना शेतीची आवडत आहे व काम करीत आहेत अशा महिलांना शेतकरी महिला प्रमाणपत्र देण्यात येत आहे यासाठी बळीराज सेनेच्या वतीने प्रसार व प्रचार करण्यासाठी पदाधिकारी यांनी जागृत रहावे असे आवाहन पक्षप्रमुख मा अशोकदादा वालम यांनी केले आहे
राज्यातील महिलांना शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येत आहे या साठी तालुका कृषी सहाय्य्क यांचे कडे संपर्कात रहावे असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत असून कोकणातील व तळ कोकणातील महिला शेतकरी यांनी याचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त महिला ना या बाबत माहिती प्रदान करून बळीराज सेनेच्या पदाधिकारी यांनी काम करावे असे आवाहन बळीराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम यांनी केले आहे
महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळण्यासाठी बळीराज सेना करणार प्रचार व प्रसार..
