मंडणगड : निवृत्त महसूल मंडळ अधिकारी मनोहर पवार यांच्या ‘समृद्धी कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ चा शुभारंभ भिंगळेली येथे करण्यात आला आहे. महसूल विभागाशी संबंधित विविध कामे नागरिकांना सुलभतेने करून देण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
‘समृद्धी कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’च्या माध्यमातून सात बार आठ -अ उतारे मिळवून देणे (ऑनलाईन), मालकी हक्कपत्र (सेल डीड) तयार करणे, वंशावळ व मालकी पत्रक तयार करणे, जमिनीची मोजणी अर्ज व प्रक्रिया, बांधकाम परवानगी व नकाशा मंजुरी, हस्त दोष दुरुस्ती, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, दुरुस्ती व फेरफार नोंदणी, नाव बदल (सुधारणा) तसेच इतर महसूल विभागाशी संबंधित कामे करून देण्यात येणार आहेत.
महसूल विभागातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले निवृत्त महसूल मंडळ अधिकारी मनोहर पवार यांच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी योग्य माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय महसूल कामांसाठी होणारी धावपळ कमी करण्याच्या उद्देशाने ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.
समृद्धी कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे कामकाज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी श्री. एम. वाय. पवार यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधावा. कन्सल्टन्सीचे कार्यालय मु. भिंगळोळी, येथे सुरु झाले भाजपा अनुसुचित मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत