चिपळूण : चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मा. जयद्रथशेठ खताते यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी जयद्रथशेठ खताते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नेते शौकतभाई मुकादम, सभापती सूर्यकांत खेतले, अशोकभाई कदम, मिलिंद कापडी, तालुकाध्यक्ष नितीनशेठ ठसाळे, दशरथशेठ दाभोळकर, नगरसेवक योगेश पवार, ग्रामपंचायत सदस्य रियाज खेरटकर, नगरसेवक शेहनाज मोडक, प्रकाश साळवी, राकेश जाधव, दिनेश शिंदे, शंशक भिंगारे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी जयद्रथशेठ खताते यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्याप्रती शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.
