चिपळूण : जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक रत्नागिरी ,शिक्षण विभाग पंचायत समिती चिपळूण व चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा २०२६-२०२७ ‌ ही दिनांक 18 ऑगस्ट रोजी ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट हायस्कूल येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये युनायटेड इंग्लिश स्कूल ,चिपळूण यांचा प्रथम क्रमांक आला .

या नाटिकेत संकल्प तांबे, अर्जुन निवळकर, स्वानंद जोशी,ओवी भावे ,सई पवार, अवंतिका जाधव हे विद्यार्थी सहभागी होते.या स्पर्धेसाठी श्रीम.दर्शना पिंपुटकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले. तसेच गुरुकुल विभागाचा माजी विद्यार्थी ओजस कुंटे याने नाटिकेचे संहिता लेखन केले. या नाटिकेसाठी विज्ञान शिक्षिका सौ . कुलकर्णी आणि सौ.गद्रे यांनी मार्गदर्शन केले.या नाटिकेसाठी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रेरणा दिली आणि शाळेतील सर्व अधिकारी वर्ग आणि शिक्षक यांनी सर्वांचे अभिनंदन केले