चिपळूण : चिपळूण रेल्वे स्टेशनला कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती अध्यक्ष शौकत मुकादम यांनी१८ ऑगस्टला अचानक भेट देऊन चिपळूण शहर बाजूकडील बंद तिकीट खिडकी असल्याचा जाब विचारला.
या बंद टिकट खिडकी मूळ चिपळूण शहर व गुहाघर बाजू परिसरातील प्रवाश्यांची गैर सोय होत आहे असे निदर्शनास आणून सदरची तिकीट खिडकी गणेश उत्सवात पूर्वी सुरू करून प्रवश्याची गैर सोय दूर करावी.
तसेच रेल्वेचे कर्मर्शियल सुपरवायझर अधिकारी श्री. खांबे यांनी सदर ठिकाणची टिकट खिडकी गणेश उस्तावा पूर्वी सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करू असे सांगितले .
त्याच प्रमाणे रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म वर प्रवाशाना २८ ऑगस्ट पासून एम यूटीएस द्वारे टिकट काढता येणार ,आहे अशी माहिती दिली.
यावेळी शौकत मुकादम,वालोप गावचे माजी सरपंच रविंद्र तांबितकर व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती अध्यक्ष शौकत मुकादम यांची रेल्वे स्टेशनला अचानक भेट!…
