सावर्डे : कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महाविद्यालयातील ८१ विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या दातांच्या आरोग्याबाबत आवश्यक योग्य मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला.
यावेळी डॉ. सलमान सुर्वे व डॉ. सृष्टी सासणे यांनी विद्यार्थ्यांना दातांची काळजी कशी घ्यावी, दातांची नियमित स्वच्छता कशी राखावी तसेच दातांच्या आरोग्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. तानाजी कांबळे यांनी केले. यावेळी वैभवी राठोड, आकांक्षा सपकाळ व श्रद्धा साळवी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे नियोजन IQAC प्रमुख प्रा. संकेत कुरणे व NSS प्रमुख प्रा. सुनील जावीर यांनी केले. विद्यार्थ्यांनी या दंत तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
कला व विज्ञान महाविद्यालयात दंत तपासणी शिबिर उत्साहातकला व विज्ञान महाविद्यालयात दंत तपासणी शिबिर उत्साहात…
