चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन चिपळूण एसटी आगाराला पाच नवीन बस उपलब्ध करून देण्यात आल्या. चिपळूण-संगमेश्वरचे आमदार मा. श्री. शेखरजी निकम, आमदार भास्करराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाल्याने या नव्या बससेवेचा लोकार्पण सोहळा चिपळूण एसटी आगारात उत्साहात पार पडला.

या बसचा शुभारंभ आमदार शेखरजी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष मा. श्री. प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा ताई शेखर निकम, प्रदेश उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम, सभापती सूर्यकांत खेतले, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, पंचायत समिती सदस्य मेघा इंगावले, सुभाष जाधव,योगेश पवार, शेनाज वांगडे, निहार कोवळें, अजय भालेकर, जागृती शिंदे, प्रकाश पवार, अदिती देशपांडे, रेहमात जबले, निलेश कदम, पूर्वा आयरे, पूनम भोजने, शमीन परकार , मनोज जाधव, विलास महाडिक, सचिन शिंदे, संजय जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विविध पदाधिकारी, एसटी अधिकारी-कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

चिपळूण-संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गासाठी एसटी बससेवा ही अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे नवीन पाच बस उपलब्ध झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. मतदारसंघातील मूलभूत सुविधा आणि प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार शेखरजी निकम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून चिपळूण आगाराला पाच नव्या बस मिळाल्याने त्यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तसेच परिवहन मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. उदय सामंत यांनीही चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाच्या वाहतूक सुविधांना प्राधान्य देत नव्या बस उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी आणि शासन यांच्यातील प्रभावी समन्वयातून चिपळूणच्या एसटी सेवेला मिळालेली ही बळकटी निश्चितच स्वागतार्ह आहे.