चिपळूण : श्री. छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्ट मार्कंडी चिपळूण यांच्या वतीने सालाबादप्रमाणे होणाऱ्या सत्यनारायण पूजेचे अवचित्य साधून रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक ३०. ०४. २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून जुनी बालवाडी शाळा, पाली रोड, मार्कंडी येथे करण्यात आले आहे.
यात रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत संघ सहभागी होणार असून प्रेक्षकांना खेळाडूंचा दर्जेदार खेळ पाहवयास मिळणार आहे. यात सर्व सामने बाद पद्धतीचे असून अंतिम विजयी संघास २११११/- व आकर्षक चषक, अंतिम उपविजयी संघास १५५५५/- व आकर्षक चषक, व उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघास ७७७७/- व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तसेच दोन्ही उपांत्य फेरीतील उत्कृष्ट खेळाडूस १०००/- व आकर्षक टीशर्ट तसेच संपूर्ण मालिकेतील उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड करणाऱ्या खेळाडूंना सुद्धा १०००/- व आकर्षक टीशर्ट देण्यात येणार आहे. तरी चिपळूणातील जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.