चिपळूण : देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काही शासकीय कार्यालयांमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शासकीय परिपत्रक निघाले नसल्याने जयंती साजरी करण्यात आली नसल्याचे एका अधिकाऱ्याने माजी सभापती शौकतभाई मुकादम यांना सांगितले.
राजीव गांधी यांनी देशाच्या विकासासाठी आणि आधुनिक भारताच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. देशासाठी बलिदान देणाऱ्या माजी पंतप्रधानांच्या जयंतीचा शासकीय कार्यालयांना विसर पडणे ही दुर्दैवी बाब असल्याचे मुकादम यांनी सांगत नाराजी व्यक्त केली.
शासकीय पातळीवर अशा राष्ट्रीय नेत्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचे कार्यक्रम नियमितपणे व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.