अमरावती : आमदार रवी राणा यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका करत मोठे राजकीय वक्तव्य केले आहे. विरोधक हळूहळू संपत चालले असून त्यांना काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याशिवाय पर्याय नसल्याचा दावा त्यांनी केला. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार , असा दावा रवी राणा यांनी केला. भाजपविरोधात सर्व विरोधक एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत राणा यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.