जालना : जालना जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पैशांसाठी एका चिमुकल्याचे हातपाय बांधून त्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चिमुकल्याची सुखरूप सुटका केली.
या प्रकरणी चिमुकल्याच्या आईच्या दुसऱ्या पतीविरोधात जालन्यातील जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मारहाणीची घटना शिर्डी येथे घडल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक यांनी दिली. पोलिसांनी चिमुकल्याला सुरक्षितपणे नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.