मुंबई- राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती आणि अहिल्यानगरच्या राहुरी या दोन मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. मतदारसंघातील निवडणुकांसाठी आज म्हणजेच 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. परिणामी, बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. तर राहुरीच्या जागेवर शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे निवडणूक रिंगणात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघात आज मतदान पार पडणार आहे.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट न केल्याने त्यांचे समर्थक नेमका कोणाला पाठींबा देणार हे पाहणं महत्वाचे राहणार आहे.