चिपळूण : शिवसेना नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी आज मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील बहादुरशेख नाका येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. दोन वर्षांपूर्वी बहादूरशेख नाका येथे या उड्डाणपुलाचा एक मोठा भाग गर्डरसह कोसळला होता.

या पार्श्वभूमीवर पुन्हा अशी दुर्घटना घडू नये म्हणून कोणती काळजी घेण्यात आली आहे आणि उपाययोजना करण्यात आल्या आहेत तसेच या पुलाच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्याचा दर्जा या सगळ्याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उप अभियंता श्री. नाजीम मुल्ला, शाखा अभियंता श्री. शाम खुनेकर, ब्लूम कंपनीचे टीम लीडर श्री. वाय. एस. राव, स्ट्रक्चरल इंजिनियर श्री. अमोल कारंडे, ब्रिज इंजिनियर श्री. अर्जुन छत्तोराय, प्रोजेक्ट मॅनेजर श्री. सातपुते, सुरक्षा अभियान श्री. शहाबुद्दीन रशीद यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.