चिपळूण : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, चिपळूण या संस्थेची चौवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मा. प्रभाकरजी आरेकर यांचे अध्यक्षतेखाली स्वा. सावरकर सभागृह चिपळूण येथे संपन्न झाली. यावेळी सन २०२५/२६ या आर्थिक वर्षामध्ये संस्थेने केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा अहवालाव्दारे सभासदांसमोर मांडण्यात आला. यावेळी संस्थेने केलेल्या आर्थिक प्रगतीची माहिती सादर करण्यात आली. तसेच संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ करताना संस्थेचे कार्यक्षेत्र बाढ करून महाराष्ट्र राज्य करणेचा तसेच संस्थेची नवीन स्वतंत्र वास्तू उभारण्याचा संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रभाकर आरेकर यांनी जाहीर केला. सन २०२५/२६ या आर्थिक वर्षअखेर संस्थेचे भागभांडवल १३ कोटी झाले आहे. संस्थेच्या एकूण ठेवी रुपये २७५ कोटी २२ लाख असुन एकूण कर्ज व्यवहार रुपये २२९ कोटी ३६ लाख आहे. संस्थेचा एकूण निधी रुपये २३ कोटी १७ लाख असुन एकूण गुंतवणूका रुपये १०८ कोटी ५० लाख आहेत. संस्थेचा एकत्रित व्यवसाय रुपये ५०४ कोटी ५८ लाख असून खेळते भांडवल रुपये ३४८ कोटी ७३ लाख इतके आहे. संस्थेला सन २०२५/२६ या आर्थिक वर्षात रुपये २० कोटी १२ लाख एकूण नफा झाला असुन नियमानुसार सर्व तरतुदी नंतर रुपये ८ कोटी ९० लाख निव्वळ नफा झालेला आहे. संस्थेला २०२५/२६ साठी ऑडीट वर्ग अ प्राप्त झाला असून सभासदांना १४% लाभांश जाहिर करण्यात आला. उपस्थित सभासदांनी संस्थेने केलेल्या प्रगतीचे कौतुक करून कोकणातील विश्वासार्ह पतसंस्था म्हणून संस्थेने नावलौकीक प्राप्त केला असून त्याबद्दल संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मा. श्री प्रभाकर आरेकर, संघालक मंडळ सदस्य व कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन व कौतुक केले.

यावेळी संस्थेच्या सभासदांच्या १० वी, १२ वी, पदवी, पद्व्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत पाल्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या विशेष पुरस्कार प्राप्त सभासदांचा संस्थेचे वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पुरस्कार प्राप्त डॉ. राहुल निश्वनाथ दंडगे, सामाजिक कार्यकर्ते व चिपळूणचे नगरसेवक श्री मिथिलेश नरळकर, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक मा. सुनिल खेडेकर, मराठा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री दत्ताराम सुर्वे, वैदयकिय परीक्षा उत्तीर्ण डॉ. राजरत्न राष्ट्रपाल सावंत, सीए. कु. तन्ची संतोष खातू या नेत्रदिपक यश प्राप्त गुणवंतांचा संस्थेचे वतीने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे उत्तमप्रकारे काम करणारे कर्मचारी श्री. अनिकेत अनंत दामुष्ठे, श्री. अजिंक्य उदय तवसाळकर व श्री सुचित सुरेंद्र चव्हाण या कर्मचा-यांचा आदर्श कर्मचारी २०२६ पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रभाकर आरेकर यांनी संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचे विवेचन करून संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली व संस्थेच्या यशामध्ये संस्थेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार व कर्जदार तसेच कर्मचारी वर्ग यांचा मोलाचा वाटा असुन त्यांचे हिताला प्राधान्य देवूनच संस्थेचे कामकाज केले जाईल असे नमूद केले. संस्थेचा शाखा विस्तार करून संस्थेला समक्ष करण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ प्रयत्नशिल असुन त्यासाठी यापूढेही सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. हेमचंद्र हळदणकर संचालक सर्वश्री दिलीप मयेकर, अरुण पाटील, सुहास भोसले, विजय जाधव, पराग आरेकर, दिलीप वानरकर, उदय बेल्हाळ, संचालिका सौ. स्मिता आरेकर, श्रीम. प्रज्ञा नरवणकर, पल्लवी भाटकर, संस्थेचे सभासद व चिपळूण अर्बन बँकेचे संचालक मा. सुनिल खेडेकर सर्वश्री दत्ताराम सुर्वे, रमेश जाधव, गंगाधर गोंजारे, नंदकुमार तांबे, वसंत भोजने, संजय देवरुखकर तसेच अनेक सन्मा. सभासद व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. सभेचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे व्यवस्थापक श्री. संदिप रहाटे यांनी केले.