खेड : येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेडच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मान्यतेने, जिल्हा क्रीडा परिषद, रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय तायक्वॉंडो स्पर्धेत १४ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कांस्य पदकांची कमाई केली आहे.
या स्पर्धेत तालुक्यातून १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या तालुकास्तरीय तायक्वॉंडो स्पर्धेत अंश धामणकर, आयुष जाधव, मानव सागवेकर, आरोही तांबे, आर्या कदम, सई गोगावले, स्वरा चव्हाण, ईश्वरी गोरे, अनन्या मोहिते, सई चाळके, रुद्र आदावडे, रिझा काझी, देवाशिष तपकिरे आणि रुद्र राऊल यांनी सुवर्णपदक मिळविले.
शशांक पवार, शुभ्रा देवकाते, शांभवी वाघ, कार्तिक चव्हाण, अम्मार जुईकर आणि आरोही तांबे यांनी रौप्यपदक, तर ओम गोगावले, शुभंकर चव्हाण, अवधूत देसाई आणि स्वरूप पवार यांनी कांस्यपदक मिळविले. तसेच, सर्व सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची १० आणि ११ सप्टेंबर २०२६ रोजी राजापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय तायक्वॉंडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व तायक्वॉंडोपटूंना शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. कृणाल चव्हाण आणि क्रीडा मार्गदर्शक श्री. पंचशील चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी तायक्वॉंडोपटूंचे शाळेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी आणि मुख्याध्यापिका सौ. भुमिता पटेल यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
