खेड : येथील उच्च शिक्षणाची कास धरणाऱ्या रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या ३० विद्यार्थ्यांनी नीट २०२६ परीक्षेत घवघवीत यश संपादन करून वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणाच्या प्रवेशासाठी पात्रता मिळवली आहे. नीट २०२६ परीक्षेत मिळविलेल्या यशामुळे विद्यार्थ्यांना विविध शासकीय व नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे.
पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांना मुंबईमधील केईएम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज, सायन तसेच कोल्हापूर, सातारा, मिरज, रत्नागिरी, वाशिम, जालना, हिंगोली, अलिबाग, सिंधुदुर्ग, नागपूर, धुळे, पुणे, कर्जत, कुडाळ आदी ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे.
रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये श्लोक हरवांडे, सिद्धी शेळके, तनिषा चव्हाण, अथर्व क्षीरसागर, आयुष वाजे, समृद्धी लवेकर, आसावरी पाटील, मृदुल घाटे, इरा कदम, श्रेया गुरसाळे, एकस्तोर कौर, प्रक्षालिनी नाईकवाडे, तन्मय आखाडे, अनुष्का जैन, ईशा पवार, सार्थक जाधव, रिया चिपळूणकर, समृद्धी कुदळकर, ध्रुव पाटील, अर्जुन जाधव, तृप्ती कुळ्ये, शर्वरी घाडगे, अवशेषकुमार मेहता, ध्रुव साळवी, ओम तोडकरी, मिकदाद कालसेकर, इफ्रा मसोहुद्दीन, सृष्टी तेटांबे, सैफ देशमुख आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
