खेड : तालुक्यातील शिक्षकांचा ‘आदर्श गुरुवर्य’ पुरस्कार सोहळा लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने येथील एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड येथे आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला पंकजभाई शहा, चेअरमन शमसभाई मुकादम, अण्णासाहेब बेहरे टेक्निकल इन्स्टिट्यूट, खेड, अंजुमन ए तालीम शिक्षण संस्थेचे खेडचे सचिव ला. हनीफभाई घनसार, सहजीवन शिक्षण संस्थेचे सदस्य मिलिंद तलाठी, प्रफुल्ल मोरे, शालेय समिती सदस्य, कनिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय, तळे, माजी प्रांतपाल ला. वीरेंद्र चिखले, एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल, खेडच्या मुख्याध्यापिका सौ. तिसेकर, एस. एम. इंग्लिश मीडियम स्कूल, दस्तुरीचे चेअरमन श्री. नाडकर, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, महेंद्र शिरगावकर, ला. ज्ञानेश्वर मर्कड, ला. विवेक कदम, माजी अध्यक्ष ला. शंकर पार्टे, ला. विनोद मोरे, पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कुटुंबीय तसेच बहुसंख्य शिक्षणप्रेमी उपस्थित होते.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन ला. सुरेश चिकणे व ला. उत्तम कांबळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन ला. अनिल मोरे यांनी केले.

या वेळी पुढील शिक्षकांना ‘आदर्श गुरुवर्य’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले :

  1. अलताफ मुसा करबेलकर – एम. आय. बी. गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, खेड.
  2. सौ. मेहजबीन परवेज महाडिक – एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, खेड.
  3. श्री. विनोद सुधाकर टेंबे – ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगाव.
  4. श्री. हसनमियां अब्दुल समद रिफाई – हाजी एस. एम. मुकादम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, खेड.
  5. श्री. रामचंद्र विठ्ठल मसेकर – एल. पी. इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, खेड.
  6. श्री. विलास सदानंद बेंद्रे – नवभारत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, भरणे.
  7. श्री. आनंद सोमय्या हिरेमठ – छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे.
  8. श्री. विवेकानंद गोविंद कांबळे – श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, खेड.
  9. श्री. सागर प्रमोद मोरे – एस. एम. इंग्लिश मीडियम स्कूल, दस्तुरी.
  10. सौ. शितल सलील जागुष्टे – एल. टी. टी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, खेड.
  11. श्री. राजेश रघुनाथ भागणे – जि. प. पू. प्राथमिक शाळा, साखरोळी मोरेवाडी.
  12. श्रीमती रसिका रमेश रेवाळे – जि. प. शाळा, आंबवली.
  13. श्रीमती भक्ती काशिनाथ घडशी – श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल, वेरळ.
  14. श्री. बाळू दत्तात्रय राऊत – रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड.
  15. श्री. प्रतिक परशुराम पवार – ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, मोरवंडे-बोरज.
  16. सौ. स्मिता प्रकाश सरदेसाई – विश्वनाथ विद्यालय, लवेल.

तसेच, लायन्स क्लबमध्ये कार्यरत असून शिक्षकी पेशात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ला. सुरेश चिकणे, विद्यमान सचिव ला. उत्तम कांबळे आणि माजी खजिनदार ला. अनिल मोरे यांना लायन्स क्लबच्या वतीने विशेष ‘आदर्श गुरुवर्य’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सदर ‘आदर्श गुरुवर्य’ पुरस्काराचे पुरस्कर्ते ला. सुरेश चिकणे, माजी चेअरमन, माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, रत्नागिरी तसेच ला. उत्तम कांबळे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती, यांचाही क्लबच्या वतीने सन्मान करण्यात आला.