बारामती : दादांना जाऊन तीन महिने देखील झाले नाही आहे. आणि ही पोट निवडणूक लागलेली आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे. आज आम्ही सर्व मतदानासाठी आलेलो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने जो अधिकार दिला आहे,एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आपण केल पाहिजे,मोठ्या संख्येने दादांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करा अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सर्वांना करते,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, मतदान झाल्यावर मी नेहमीच काकींची भेट घेण्यासाठी येत असते. त्यांची तब्बेत बरी आहे,आमचे एकत्र कुटुंब आहे त्यामुळे सर्व जण एकत्रित लग्नाची तयारी करत आहोत.बारामतीमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, त्यातून अजितदादांना श्रद्धांजली द्यावी, असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.