मुंबई : संजय राऊत, तुमच्या पक्षात लोकशाही आहे का याचे आधी उत्तर द्या. उबाठा गटात कुठेही लोकशाही शिल्लक नाही. मुळात लोकशाही असायला तुमच्याकडे लोकच शिल्लक राहिलेले नाहीत. उबाठा हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत एवढ्या तीन लोकांचा प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झाला आहे. नितेश राणे यांनी वर्णन केल्याप्रमाणे उबाठा गटाचा आता बचत गट झालाय. बचत गटातही तुमच्या पक्षापेक्षा जास्त सभासद असतात. त्यामुळे लोकशाहीच्या गप्पा संजय राऊतांनी करू नयेत, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
न्यायालयाचा लिखित निकाल हाच अधिकृत असताना सामनाचे कार्यकारी संपादक जनाब संजय राऊत उच्च न्यायालयाच्या निकालावर टिप्पण्या करताहेत. संपादक होण्याची बौद्धिक क्षमता नसल्यानेच उद्धवजींनी त्यांना संपादक केले नसेल. तुम्हाला अग्रलेख लिहायचा असेल तर केंद्रात काँग्रेस सरकार असताना सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे पिंजरा, पोपट असे उल्लेख केले होते, त्याबद्दल लिहा. हे जनतेच्या हितासाठी काम करणारे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सातत्याने जनतेत असतात. तुमच्यासारखे घरात बसून मातोश्री दोन बांधण्याचे काम आमचे नेते करत नाहीत. तुम्ही आधी आपला पक्ष सांभाळा आणि मग सरकारवर टीका करा, असे श्री. बन यांनी सुनावले.
उबाठा गट आता केवळ तीनच जणांचा प्रायव्हेट लिमिटेड पक्ष – नवनाथ बन यांचा घणाघात
