चिपळूण : जिल्हा परिषद शिक्षण विभाग, माध्यमिक रत्नागिरी, शिक्षण विभाग पंचायत समिती चिपळूण आणि चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा २०२६–२७ दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट हायस्कूल येथे उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण यांच्या विज्ञान नाटिकेने प्रभावी सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक संकल्पना, अभिनय आणि प्रभावी संवाद यांच्या उत्कृष्ट संगमातून उपस्थितांची मने जिंकली.
या नाटिकेत संकल्प तांबे, अर्जुन निवळकर, स्वानंद जोशी, ओवी भावे, सई पवार आणि अवंतिका जाधव या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला.
या यशासाठी श्रीमती दर्शना पिंपुटकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच गुरुकुल विभागाचे माजी विद्यार्थी ओजस कुंटे यांनी नाटिकेचे संहिता लेखन केले. विज्ञान शिक्षिका सौ. कुलकर्णी आणि सौ. गद्रे यांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामागे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची प्रेरणा, शाळेतील अधिकारीवर्ग व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
या शानदार यशाबद्दल युनायटेड इंग्लिश स्कूलच्या विजेत्या विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व संपूर्ण टीमचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. विज्ञान नाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीतील मानाचा तुरा ठरले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समिती सदस्य सारिकाताई भावे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय बनसोडे, उपमुख्याध्यापिका सौ. कारदगे, पर्यवेक्षक श्री खाडे व मुंडेकर तसेच पालक अमर पवार यांनी खूप खूप अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
युनायटेड इंग्लिश स्कूलचा विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत दैदिप्यमान प्रथम क्रमांक
