रायगड : रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपालिका हद्दीतील लव्हेज गावच्या अपुरा पाणीपुरवठा मुळे हैराण असलेल्या ग्रामस्थांना अखेर पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर पाईपलाईन मधील लिकेज काढून पाणीपुरवठा सुरळीत केला आहे.
अनेक दिवसापासून या गावच्या अपुरा पाणीपुरवठ्याने ग्रामस्थ आहे रान होते सदरची बाब आमदार थोरवे यांना सांगितल्यानंतर त्यांनी यासाठी 37 लाख रुपयांची निधी उपलब्ध करून दिला, मात्र ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचा पाईप दिल्याने वारंवार लिकेज ची समस्या उभी राहिल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे, वारंवार लिकेजमुळे ग्रामस्थ हैराण झाले होते अखेर ग्रामस्थांनी पालिका कार्यालयात धडक दिल्याने पाणीपुरवठा विभाग जागा झाला आणि त्यांनी युद्धपातळीवर मंगळवार सायंकाळ पासून बुधवारी पहाटेपर्यंत लिकेज काढण्याचे काम केले अखेर पहाटे पाच वाजता पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. धक्कादायक बाब अशी की या पाईपचे बिल अदा करण्यात आले त्याचप्रमाणे सुरक्षित ठेव ती सुद्धा ठेकेदाराला देण्यात आल्याने ग्रामस्थांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.