नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
आठवडाभरापूर्वी २० ते २५ रुपये किलो असलेला कांदा आता ३५ ते ४० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. तर वाशीच्या किरकोळ बाजारात कांद्याचे दर थेट ७० ते ८० रुपये किलोवर गेले आहेत. साठवणुकीतील कांदा मोठ्या प्रमाणात खराब होत असल्याने बाजारातील आवक घटली आहे. शेतकऱ्यांनी ऑफ सीझनसाठी गोदामात साठवलेल्या कांद्यापैकी जवळपास निम्मा कांदा खराब होत असल्याचा दावा कांदा व्यापारी दिगंबर राऊत यांनी केला आहे.
