दापोली :- दापोलीत शिवसेनेच्या वतीने यंदा भव्य दहीहंडी उत्सव २०२६ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार असून, यंदाच्या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण असलेली ‘मानाची हंडी’ तब्बल 3 लाख 51 हजार रुपयांची ठेवण्यात आली आहे. दापोली शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर, केळस्कर नाका,दापोली येथे या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी गोविंदा पथके तसेच दहीहंडीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उत्सवात दहीहंडी फोडण्यासाठी विविध गोविंदा पथके सहभागी होणार असून, थरावर थर रचत दहीहंडी फोडण्याचे रोमांचक दृश्य दापोलीकरांना अनुभवता येणार आहे. 3 लाख 51 हजार रुपयांच्या ‘मानाची हंडी’
मुळे यंदाच्या उत्सवाची रंगत आणखी वाढणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने खास आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दहीहंडी फोडण्याच्या थरारासोबतच उपस्थितांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
या भव्य दहीहंडी उत्सवाचे पुरस्कर्ते श्री. योगेशदादा रामदास कदम, गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना महिला आघाडी, दापोली यांच्या पुढाकाराने हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
दापोली शहर व परिसरातील नागरिकांनी, गोविंदा पथकांनी आणि दहीहंडीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य दहीहंडी उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
दिनांक : ५ सप्टेंबर २०२६
स्थळ : श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर, केळस्कर नाका, दापोली
‘मानाची हंडी’ : ₹ 3,51,000/-