मुंबई / चिपळूण :- महाराष्ट्र शासनाच्या युवा शेतकरी पुरस्काराने सन्मानित युवा उद्योजक श्री. मिथिलेश हरिश्चंद्र देसाई यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा-राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनिताताई पवार यांनी चर्चेसाठी बोलावले होते. या भेटी दरम्यान त्यांनी देसाई यांचे पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यातील योगदानाबद्दल अभिनंदन केले.
यावेळी मिथिलेश देसाई यांनी महाराष्ट्र राज्यात ‘जॅकफ्रूट (फणस) मिशन’ सुरू करण्याची आणि ‘जॅकफ्रूट सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती उपमुख्यमंत्र्यांना केली. कोकणातील फणसाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे….
या संपूर्ण प्रवासात आमदार शेखर निकम यांनी पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिल्याबद्दल मिथिलेश देसाई यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. या भेटीसाठी आमदार शेखर निकम देखील उपस्थित होते….
