सावर्डे : कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे येथील महिला विकास कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये “Polyendocrine Metabolic Ovarian Syndrome (PMOS)” या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी डॉ. अक्षता शेंबेकर यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी PMOS या समस्येविषयी सविस्तर माहिती देताना त्याची कारणे, लक्षणे, हार्मोन्समधील असंतुलन, जीवनशैलीचा परिणाम तसेच योग्य आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांनींना मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आणि आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. टी. वाय. कांबळे सर, तसेच प्रा. चवरे, प्रा. कुरणे, प्रा. जावीर, प्रा. आवळे मॅडम, प्रा. अवनी कदम आणि प्रा. जाधव मॅडम उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील बी.ए. व बी.कॉम.च्या सर्व विद्यार्थ्यांनीनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. दीप्ती शेंबेकर मॅडम यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून तज्ज्ञ मार्गदर्शकांचा परिचय करून दिला
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. पूजा आवळे मॅडम आभार मानले.
PMOS विषयावरील विशेष अतिथी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनशैलीचे मार्गदर्शन…
