
चिपळूण : तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान सकाळी ९:३० वाजेपर्यंत ११:३२ टक्के मतदान झाले आहे. अनेक गावात मशीन बंद पडल्याने मतदानात अडथळा निर्माण झाला होता. मात्र पुन्हा या मशीन सुरु करण्यात आल्या.
मालघरमध्ये बोटाची शाही आपोआप पुसली जात असल्याने खळबल उडाली होती. तर शिरगावमध्ये सकाळी एक तास दोन मशिन बंद होत्या. सावर्डे कॉलनीत 9 वा. मशीन बंद पडली होती. सावर्डेतील कॉलनी, पिंपळ मोहल्ला, कुडप, गुढेकरवाडी, मांडकी व खरवते येथील evm मशीन बंद पडली होती. खेर्डीमध्ये मशीन बंद पडली होती आता सुरु करण्यात आली आहे
खेर्डी ८८ मध्ये पाऊण तास मशीन बंद होती.
कौढर ताम्हणे येथेही मशीन बंद पडले होते.
तालुक्यात अद्याप उत्स्फूर्तपणे मतदान सुरु असून सकाळच्या टप्प्यात काही मतदान केंद्रावर गर्दी दिसत होती. अनेक गावांमध्ये मतदानासाठी मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा दिसून येत असून ईव्हीएम मशीनच्या घोळामुळे मतदारांना काही ठिकाणी ताटकळत राहावे लागले होते. मात्र आता यावर प्रशासनाने योग्य ती मात करून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू केली आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY