मंडणगड : भारतीय जनता पार्टी तालुका मंडणगड यांच्यावतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पुर्व संध्येला भिंगळोली येथील तहसिल कार्यालयाचे प्रांगणात नमो दहीहांडी सराव शिबीर 2026 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आले. तालुक्यातील गोविंदा पथम मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते जन्माष्टमी पुर्वसंध्येचा हा कार्यक्रम गोविंदांचा उत्साह वाढविणारा व त्यांना नवचैतन्य देणार ठरला.
परिसरातून आठ दहिहांडी पथकांनी आपली कला या सराव शिबीरात सादर केली भिंगळोली येथील कन्हाया गोविंदा पथकाने सहा थर लावून सराव शिबीराची दहीहांडी फोडण्याचा मान मिळवीला. भाजपा कोकण पदवधीर मतदार संघाचे सहसंयोजक अजय दळवी, यांच्या संकल्पनेतून तालुक्यात प्रथमच राबविल्या गेलेल्या या उपक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला कार्यकारिणी सदस्या मंजुषा कुद्रिमोती, जिल्हा अध्यक्ष सतिष मोरे, महिला आघाडी अध्यक्षा स्मिता जावकर, अजय दळवी तालुका अध्यक्ष दत्ता महाडीक जिल्हा अध्यक्ष सचिन थोरे, सोशल मिडीया जिल्हा संयोजक वैभव नारकर, महिला आघाडी अध्यक्षा श्रेया दळवी, शहर अध्यक्ष आनंद नारकर, सरचिटणीस अँड, सुशिल दळवी, उपाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, विजय दुर्गवले यांच्यासह मंडणगड व भिंगळोली येथील मान्यवर प्रतिष्ठीत नागरीक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष दत्ता महाडीक यांच्या मार्दर्शनाखाली सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.
