चिपळूण- कोकणातील नामवंत त्वचारोग तज्ञ आणि समाजसेवक डॉ.यतीन जाधव यांच्या चिपळूणमधील खेंड येथील विभा अरविंद ग्रंथालयाला चिपळूणचे माजी आमदार श्री.सदानंद चव्हाण यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.

यावेळी डॉक्टर जाधव यांनी चव्हाण उभयतांचे स्वागत केले. चिपळूण पालिकेतील शिवसेनेचे गटनेते अंकुश आवळे हेही यावेळी उपस्थित होते.
वाचन संस्कृती समृद्ध आणि वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने डॉक्टर जाधव यांनी आपल्या आई वडिलांच्या नावाने सुरू केलेली ग्रंथालयाची चळवळ खरोखरच कौतुकास्पद असून या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे अशा शब्दात माजी आमदार चव्हाण यांनी डॉक्टर जाधव यांचे कौतुक केले.