मंडणगड : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमातंर्गत नुकतेच भित्तीपत्रकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. साई पवार, प्रा. प्राची कदम, प्रा. एैश्वर्या कांबळे, प्रा. रिदा चिमावकर, डॉ.दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. साई पवार यांनी सदर पोस्टर प्रकाशनबाबत विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती सांगितली. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टरमध्ये महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, पंडित जवहारलाल नेहरु, भगतसिंग, राजगुरु आदींचा समावेश होता. सदर भित्तीपत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयातील सर्व विद्याथ्र्यांनी या भित्तीपत्रक प्रकाशनाचा लाभ घेतला.
यावेळी घेतलेल्या भित्तीपत्रक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. सायली भुवड – इयत्ता 11वी वाणिज्य हिने संपादन केला. व्दितीय क्रमांक कु. मेहर अन्सारी व कु. रेहाना इलियास – इयत्ता 11 वी विज्ञान यांना विभागून देण्यात आला. तर तृतीय क्रमांक कु. तरन्नुम खान – 12वी वाणिज्य हिने संपादन केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र व बक्षीस देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. महादेव वाघ व प्रा. प्राची कदम यांनी काम पाहिले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. एैश्वर्या कांबळे यांनी मानले.
कर्मवीर दादा इदाते कनिष्ठ महाविद्यालयात भित्तीपत्रकाचे प्रकाशन..
