खेड : येथील राज्य परिवहन महामंडळाच्या खेड बस स्थानकाच्या आवारात नो पार्किंग झोनचा नामफलक लावलेला असतनाही, अनेक प्रवासी जनतेने आपापल्या दुचाकी उभ्या करुन वहातूकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे बस स्थानक की पाार्किंग झोन असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाप्रकारे वहातूकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणाची गंभीर दखल स्थानक प्रमुखांनी घेऊन दुचाकीस्वारांवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी प्रवासी जनतेकडून होत आहे.
बस स्थानकाच्या आवारात नो पार्किंग झोनचा नामफलक असताना आणि तो स्पष्टपणे दिसत असतानाही दुचाकी उभ्या करणे म्हणजे वहातुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यासारखे असुन याची गंभीर दखल स्थानक प्रमुखांनी घ्यावी आणि वहातूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कायदेशीर कारवाई करावी. कारण याच दुचाकी भविष्यात अपघाताचे केंद्र बिंदु ठरणार आहेत. एस.टी. बसेस मागे पुढे करताना बसेसचा धक्का बसला आणि काही नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण ? दुचाकीस्वार कि बस चालक/ ड्रायव्हर असा सवाल प्रवाशी जनतेतून विचारला जात आहे. या धक्क्यातून बसपेक्षा दुचाकींचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. याची नोंद दुचाकीस्वारांनी घेऊन नो पार्किंग झोनच्या ठिकाणी दुचाकी उभ्या करायच्या नसतानाही, दुचाकीस्वार दुचाकी कशा काय उभ्या केल्या जात आहेत. अशाप्रकारे दुचाकी उभ्या करणे म्हणजेच वहातूकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यासारखे आहे. मग वहातूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, दुचाकीस्वारांवर कायदेशीर कारवाई का केली जात नाही. हे दुर्दैव आहे. ही बाब योग्य नाही, म्हणूनच नो पार्किंग झोनच्या नामफलकाजवळ दुचाकी उभ्या करणे म्हणजेच वहातूकीच्या नियमांचे उल्लंघन होय, तर मग आगार व्यवस्थापक रा.प. खेड कायदेशीर कारवाई कधी करणार आहेत, असा सवाल प्रवाशी जनतेत उपस्थित होत असुन, अशा प्रकारे नो पार्किंग झोनमध्ये दुचाकी उभ्या केल्याने बस स्थानकात तिकिट रिझर्व्हेशन करण्यासाठी जाणे व बस स्थानकात अन्य महत्त्वाच्या कामासाठी जाणे अवघड बनले आहे.याची गंभीर दखल स्थानक प्रमुख रा प अधिका-यांनी घ्यावी. अशी अपेक्षा प्रवासी जनतेतून व्यक्त होत आहे.