चिपळूण :कालूस्ते (मावळतवाडी) येथील देवता क्लिनिकमध्ये नुकतेच मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात डॉ. निशिकांत सावंत आणि डॉ. सागर शिर्के यांनी होमिओपॅथी व वैकल्पिक चिकित्सा याद्वारे नागरिकांना मोफत आरोग्य सल्ला दिला.
या उपक्रमात ग्रामस्थांची रक्तदाब व मधुमेहासारख्या आजारांच्या प्राथमिक तपासणी करून योग्य मार्गदर्शन करण्यात आले आणि गरजूंना मोफत औषधोपचार वाटप करण्यात आले. या उत्तम उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी डॉ. निशिकांत सावंत आणि डॉ. सागर शिर्के यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी कालूस्ते बुदुकच्या सरपंच सौ. जिया कदम, उपसरपंच श्री. अजित घाग , माजी सरपंच श्री. रामकृष्ण कदम, धामेली गावचे माजी सरपंच बाळशेठ तटकरे, सचिन रेवाळे, लक्ष्मण गुडेकर, रजनी घाग, प्रिया कदम व ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी मोठी जनजागृती निर्माण झाली असून ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.