चिपळूण : श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार म्हणजे शिवभक्तीचा सांगता करणारा नव्हे, तर श्रद्धेला सेवेशी जोडणारा पवित्र क्षण. याच भक्तिभावातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण शहराच्या वतीने श्री रामेश्वर मंदिर, रामतीर्थ तलाव परिसर येथे भाविकांना खिचडी व केळी वाटपाचा उपक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

श्री देव रामेश्वर हे चिपळूणच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाशी नाते सांगणारे श्रद्धास्थान. शिवतत्त्व म्हणजे केवळ पूजाअर्चा नव्हे, तर त्याग, करुणा, समता आणि लोकसेवेची प्रेरणा. त्यामुळे रामेश्वराच्या चरणी आलेल्या भाविकांना अन्नप्रसाद देणे हीदेखील एका अर्थाने शिवसेवाच आहे. याच भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला सलग तिसऱ्या वर्षाची सेवापरंपरा लाभली आहे.

या उपक्रमासाठी विभागप्रमुख व नगरसेवक संजय गोताड, विभागप्रमुख रविराज (बापू) चिपळूणकर आणि उपविभागप्रमुख दीपक कदम यांचे सौजन्य व विशेष सहकार्य लाभले. शहर सचिव प्रशांत मुळये यांनी नियोजनासाठी विशेष परिश्रम घेत, या सेवाकार्याला संघटनात्मक स्वरूप दिले. समाजातील विविध घटकांनी अशा उपक्रमांसाठी पुढे येणे ही सकारात्मक सामाजिक परंपरा असून, ती भविष्यातही अशीच सुरू राहावी, असे आवाहन करत त्यांनी सर्व सौजन्यकर्ते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

यावेळी तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, युवासेना शहराधिकारी पार्थ जागुष्टे, उपशहरप्रमुख तथा गटनेते व नगरसेवक मिथिलेश (विकी) नरळकर, उपतालुका प्रमुख सचिन शेट्ये, उपशहरप्रमुख संजय रेडीज, मनोज पांचाळ, विभागप्रमुख प्रमोद गांगण, संतोष मिरगल, दीपक ओकटे, बंधू कदम, महेश संसारे, पांडुरंग निवाते, सावळाराम सातपुते, उपविभागप्रमुख विकास गांगण, शाखाप्रमुख सतीश शिंदे, विशाल पवार, समीर माळी तसेच श्री देव रामेश्वर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष शशिकांत पवार, भाऊ पवार, रामदास जाधव आदी उपस्थित होते.

श्रावणाच्या पवित्र पर्वाच्या समारोपदिनी रामेश्वराच्या साक्षीने झालेला हा अन्नप्रसाद वाटपाचा उपक्रम म्हणजे श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम ठरला. मंदिरातील शिवभक्ती जेव्हा भाविकांच्या सेवेत उतरते, तेव्हाच भक्तीला व्यापक सामाजिक अर्थ प्राप्त होतो आणि म्हणूनच ‘रामेश्वराच्या चरणी भक्ती… भाविकांच्या सेवेतून व्यक्त होणारी शक्ती!’ हा या उपक्रमाचा खरा संदेश ठरला.