चिपळूण : शहरातील प्रलंबित नागरी समस्या, प्रशासनाची ढिलाई आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजी कारभाराविरोधात चिपळूण शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत चिपळूण नगरपरिषद प्रशासनाला जाब विचारला.

शहर प्रमुख श्री. सचिन उर्फ भैया कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज मा. मुख्याधिकारी श्री. संजय जाधव यांची भेट घेत यापूर्वी दिलेल्या निवेदनांबाबत आतापर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली याचा आढावा घेत पाठपुरावा केला.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असून प्रशासनाने तात्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी उपशहर प्रमुख संजय रेडीज, मनोज पांचाळ, युवा सेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, शहर सचिव प्रशांत मुळ्ये, विभाग प्रमुख रविराज उर्फ बापू चिपळूणकर, संतोष मिरगल, बंधू कदम, शाखा प्रमुख नवीनचंद्र किल्लेकर, ,युवा सेना उपशहरअधिकारी आकाश कदम, विभाग अधिकारी राहुल गुरव, सोहम कदम, मनीष काणेकर, आशिष कदम आदी पदाधिकारी तसेच संबंधित विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.