चिपळूण : गणेशोत्सवाच्या मंगलमय निमित्ताने सर्व स्थानिक ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, असुर्डे विभाग यांच्या वतीने मोफत चहा वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ आमदार श्री. शेखर निकम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी प्रसिद्ध उद्योजक श्री. सचिन (पिंट्या शेठ) पाकळे, श्री. केतनशेठ पवार, श्री. राजूशेठ बेर्डे, सावर्डे पोलीस निरीक्षक श्री. आबासो पाटील साहेब, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. अनिरुद्ध निकम, जिल्हा नियोजन सदस्य श्री. विजयराव गुजर, कोकरे जि. प. सदस्य श्री. संजयराव कदम, पंचायत समिती सदस्या श्रीमती उज्वला घाग-साळवी मॅडम, ग्रा. पं. सदस्या श्रीमती सारिका दळवी, श्रीमती स्वाती दळवी, श्री. नागेश शेठ साळवी, असुर्डे सरपंच श्री. पंकजजी साळवी, देवराज गरगटे, तुषार बिजीतकर, गणेश सावर्डेकर, शैलेश खापरे, उद्धव साळवी, महेंद्र नरोटे, विजय सावंत, सुरेश साळवी, वसंत साळवी, सतीश सावर्डेकर, संदीप घाग, अनिकेत भंडारी, महेंद्र खापरे, साहिल भंडारी, मुन्ना साळवी, प्रशांत वाघाटे, चिरंजीव भंडारी, अनिल पाष्टे, सुदर्शन पाष्टे, अमर खापरे, राकेश खापरे, मंगेश घडशी, धीरज भंडारी आदी उपस्थित होते.