मुंबई (प्रतिनिधी): राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंत्रालयात आज मंगळवारी पदभार स्वीकारला.
राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी प्रदेश कार्यालयात भेट देऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून आदरांजली वाहिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, युवा नेते पार्थ पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आदींसह पक्षाचे नेते, सर्व मंत्री,आमदार उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी पदभार स्वीकारण्याअगोदर सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर आदींसह आमदार, मुंबई पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
