फणसू : पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा फरारे गाव मध्यंतरीच्या काळात राजकीय बदललेल्या समीकरणामुळे राष्ट्रवादी व नंतर उबाठा पक्षांमध्ये सक्रिय झाला होता. मात्र मागील काही काळापासून शिवसेनेचा विकासाचा झंजावात पाहून त्यांनी पुन्हा शिवसेना नेते रामदासभाई कदम राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत दापोली राधाकृष्ण मंदिर येथे शिवसेना युवा सेना महिला आघाडी यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर विधानसभा संपर्कप्रमुख सुधीर कदम,दापोली तालुका सपंर्क प्रमुख प्रदीप जाधव,विधानसभा सहसपंर्कप्रमुख प्रवीण लाड तालुका उपसंघटक रणजीत जाधव, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे,महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख रोहिणी दळवी, सभापती उन्मेष राजे,नगराध्यक्ष कृपा घाग,गटनेता निलेश शेठ उपसभापती नम्रता तोडणकर माजी समाज कल्याण सभापती चारुता कामतेकर पंचायत समिती माजी सभापती व विद्यमान सदस्य ममता शिंदे,शिवसेना सचिव व प.स.सदस्य नरेश घरटकर सहसचिव रवींद्र साळवी सहसचिव सुनील जांभळे युवा सेना तालुकाध्यक्ष संकेत पाते,मुंबई विभागप्रमुख सुनील चव्हाण,शांताराम खळे,विभागप्रमुख दिनेश जावळे,मोहन भागणे,आदी पदाधिकाऱ्यांच्या समक्ष शिवसेनेचा भगवा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत घरवापसी केली.त्यामुळे उन्हवरे बत्तीसगाव एकमाफी भगवामय झाला आहे.
नाम.योगेशदादा कदम यांनी दापोली मतदार संघामध्ये अत्याधुनिक सुख सुविधा निर्माण करण्याचे सूत्र हाती घेतल्याने दापोली मतदारसंघाचा कायापालट होताना दिसत आहे.आणि हे वास्तव कोणी नाकारू शकणार नाही याची खात्री आता आम्हाला पटल्याने आणी विकासपर्वच्या प्रभावामुळेच आता आम्ही सुद्धा शिवसेनेच्या विकास प्रवाहात सामील होत असल्याची प्रतिक्रिया प्रवेश कर्त्यांनी यावेळी दिली.
यावेळी यंगमेन सर्कल फरारेचे अध्यक्ष अय्याज खोत,जमातीचे अध्यक्ष मुखत्यार पठाण जेष्ठ कार्यकर्ते बाबा खोत,मुश्ताक खोत,अली खोत,इसा खोत नूरमोहम्मद खोत,शोएब खोत, मुनाफ खोत,कादिर दळवी,समद खोत,शाबाज खोत,मतीन खोत,अबरार डोंगरकर,सदाकत खोत इब्राहिम खोत,रऊत साखरकर,इलियाज खोत सिकंदर खोत दिलावर खोत समद खोत जहूर खोत, मोहसीन खोत आदी संपूर्ण खोतवाडी मोहल्याने यावेळी जाहीर प्रवेश केला.
गाववाड्यातून होणारा मूलभूत विकास, त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये महत्त्वाच्या सुख सुविधा निर्माण करण्यात नामदार योगेशदादा कदम यशस्वी होताना दिसत आहेत.याचा प्रभाव निश्चितच मतदारांवर पडला असल्याने
मतदार सक्रिय सहभाग घेऊन जाहीर प्रवेश करताना दिसत आहेत.
दिवसागणिक होणाऱ्या पक्षप्रवेशाचा परिणाम निश्चितच होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येईल,आणि तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायत ह्या शिवसेना पक्षाच्या अर्थातच राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली कारभार करतील असे चित्र या निमित्ताने स्पष्ट होत आहे.
