खेड : येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेतील इयत्ता 12 वी. कॉमर्स मधील विद्यार्थी फुरकान नाडकर व नमिर मुसा यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व रत्नागिरी जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11/9/2026 रोजी रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत फुरकान नाडकर याने गोल्ड मेडल प्राप्त केले व नमिर मुसा याने सिल्वर मेडल प्राप्त केले आहे. या यशाबद्दल फुरकान व नामिर यांचे त्यांच्या पालकांचे, मार्गदर्शक शिक्षक संतोष भोसले, मारुती आढाव, अतुल यांचे संस्था व प्रशालेतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. सुवर्णपदक विजेता फुरकान नाडकर याची सांगली येथे होणाऱ्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
फुरकान नाडकर आणि नमिर नाडकर यांच्या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.