मुंबई : भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्रातर्फे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी तसेच राज्याचे लोकप्रिय भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणजी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभरात १५० ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत राज्यभरातील १५० ठिकाणी अल्पसंख्याक मोर्चाचे सुमारे ११ हजारांहून अधिक कार्यकर्ते रक्तदान करणार आहेत. या रक्तदान शिबिरात मुस्लिम, ख्रिश्चन, शीख तसेच इतर अल्पसंख्याक समाजातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार असल्याची माहिती श्री. इद्रिस मुलतानी यांनी दिली.