ठाणे: मनसेचे कोपरी प्रभाग अध्यक्ष विनायक बिटला यांनी केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे आणि खालापूर येथील ग्रँड माईल्स मॉलच्या अद्ययावत सिक्युरिटी सिस्टीममुळे एका पत्रकार महिलेचे चोरीला गेलेले दहा तोळ्याचे दागिने मुद्देमालासह परत मिळण्यात यश आले आहे.

ही महिला तिच्या पतीसह पुण्यातून ठाण्यात येत होती. वाटेत जेवणासाठी हे दाम्पत्य ग्रँड माइल्स मॉलमध्ये थांबले होते.तेव्हा या संधीचा फायदा घेत परप्रांतीय चालकाने त्यांच्या बागेतील आठ तोळे सोन्याचे कडे आणि दोन तोळ्याची अंगठी हातोहात लांबवली. ठाण्यात पोहोचल्यानंतर पत्रकार महिलेला आपले दागिने चोरीला गेले असल्याचे लक्षात आल्यानंतर या दांपत्याने विनायक बिटला यांच्या ठाण्यातील कार्यालयात जाऊन घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर बिटला यांनी मनसेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आणि खालापूर येथील ग्रँड माईल मॉलमध्ये जाऊन आपल्या पद्धतीने तपास सुरू केला. कालांतराने पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या मदतीमुळे संबंधित परप्रांतीय चालकाला ताब्यात घेण्यात आले आणि त्याने चोरीची कबुली दिली शिवाय चोरलेला मुद्देमालही परत केला.
मनसे पदाधिकारी अविनाश बिटला यांच्या तत्परतेमुळे महिला पत्रकाराला चोरीला गेलेले दागिने परत मिळाल्यामुळे तिने समाधान व्यक्त केले आणि मनसेचे अभिनंदनही केले. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश पवार, मनोज चव्हाण,सतीश कोळी, विशाल शिंदे, गणेश जडियार या कार्यकर्त्यांचीही आपणाला मदत लाभली असे बिटला यांनी दैनिक सागरशी बोलताना सांगितले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY