मुंबई : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे यांच्या संस्थात्मक हत्येप्रकरणी न्याय मिळावा आणि या प्रकरणी IIT मुंबईच्या डीनना जाब विचारावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने IIT मुंबईसमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा मोठी उपस्थिती होती वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आंदोलनस्थळी दाखल झाले.

यावेळी सुजात आंबेडकर यांनी साहिल वाकोडे यांच्या न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या IIT मुंबईतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आंदोलनामागील भूमिका त्यांनी जाणून घेतली. साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा तसेच त्यांच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने देखील आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित आहेत.

आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेत निषेध नोंदवला. तसेच साहिल वाकोडे यांच्या प्रकरणात IIT मुंबई प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.