चिपळूण : अपरांत हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपी आणि न्यूरो-रिहॅबिलिटेशन सेवेला अधिक बळ मिळाले असून, Paediatric Neurosciences मधील पदव्युत्तर तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट डॉ. मार्झिया अस्लम बिजले (BPT, MPT) यांचे फिजिओथेरपिस्ट म्हणून हॉस्पिटलमध्ये स्वागत करण्यात आले आहे.

डॉ. मार्झिया अस्लम बिजले यांनी कृष्णा विश्व विद्यापीठातून Paediatric Neurosciences मध्ये Master’s Degree प्राप्त केली आहे. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी Rank Holder म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच Physiotherapy Research, Academic Presentations आणि Professional Conferences मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

अपरांत हॉस्पिटलमध्ये डॉ. मार्झिया यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या फिजिओथेरपी व न्यूरो-रिहॅबिलिटेशन सेवा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये Paediatric Neuro-Rehabilitation, Developmental Rehabilitation, Neurological Rehabilitation, Musculoskeletal Physiotherapy, Adult Neurological Rehabilitation तसेच Evidence-Based Physiotherapy यांचा समावेश आहे.

डॉ. मार्झिया यांचा उपचारपद्धतीमध्ये Patient-Centred Care, Functional Outcomes तसेच रुग्णाची जास्तीत जास्त कार्यक्षमता आणि स्वावलंबन यावर विशेष भर आहे. विशेषतः लहान मुलांच्या न्यूरो-डेव्हलपमेंटल आणि रिहॅबिलिटेशन गरजा लक्षात घेऊन आधुनिक, शास्त्रीय आणि रुग्णकेंद्रित फिजिओथेरपी सेवा देण्यावर त्यांचा भर आहे.

या सेवेमुळे लहान मुलांसह न्यूरोलॉजिकल आणि इतर शारीरिक अडचणी असलेल्या रुग्णांना आधुनिक फिजिओथेरपी व पुनर्वसन उपचाराची सुविधा अपरांत हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार आहे.