पेण(प्रशांत पोतदार) : पेण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी तारीख १६ जानेवारी २०२६ रोजी पेण नगरपरिषदेमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.आमचा नगरविकास आघाडीचा स्वीकृत नगरसेवक वैध ! पत्रकारपरिषद घेऊन स्वीकृत नगरसेवक निवडी बाबत अन्याय होत असल्याची दिली माहिती!

या सभेमध्ये एकूण ३ स्वीकृत सदस्यांपैकी भाजपच्या कोट्यातील २ सदस्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली तर माजी नगराध्यक्ष तथा नगरविकास आघाडी गटनेते संतोष विनायक श्रृंगारपुरे गटातील एक सदस्य उमेदवार उपेंद्र अनंत कोलाडकर यांच्या निवडीबाबत पीठासीन अधिकारी यांनी शासनाचा निर्णय येईपर्यंत आमच्या उमेदवाराची निवड स्थगित ठेवली आहे.यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या कडे करण्यात आलेल्या तक्रारी अर्जा बाबत करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर त्वरित दखल घेऊन करण्यात आलेला तक्रारी अर्ज फेटाळला असून नगरविकास आघाडीचा स्वीकृत नगरसेवक उमेदवार हा वैध असल्याचे पत्र नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांना देऊन नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती नगरविकास आघाडी गटनेते संतोष विनायक श्रृंगारपुरे यांनी (गुरुवारी) पत्रकार परिषद घेऊन दिली तर यावेळी नवनिर्वांचीत नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी प्रितम पाटील या निर्णय घेत नसल्याने आमच्यावर अन्याय होत आहे. या स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही नगर परिषदे समोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा ही श्रृंगारपुरे यांनी प्रशासनाला दिला.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY